Lockdown : एप्रिलफूलच्या भानगडीत पडू नका, अन्यथा...!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

देशावर कोरोनाचे संकट असताना अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

बारामती : एप्रिलफूलच्या निमित्ताने 1 एप्रिलला कोरोनाबाबत अफवा पसरविणाऱ्या किंवा लोकांच्या अडचणी वाढतील, अशा मेसेज टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिला आहे.

 - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या संदर्भात प्रसिध्दीपत्रकात शिरगावकर यांनी नमूद केले आहे की, '1 एप्रिलला एप्रिल फूलनिमित्त नागरिकांकडून वेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फूल बनवण्याकरता (जमावबंदी उठली आहे, सर्व लोकांनी रस्त्यावर एकत्र यावे) अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमातून लोकांची जनजागृती करून असे स्वरूपाचे मेसेज व्हायरल होता कामा नये, याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन प्रशासनाच्या तसेच लोकांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.'

- धक्कादायक:  कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने घातली आंघोळ; योगी सरकारवर टीकेचा भडीमार!

जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकाकडून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्यांवर, त्याचबरोबर ग्रुप ॲडमिनवरही गुन्हे दाखल होतील. ग्रुप ॲडमिनने आत्ताच आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात. तसेच सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल, असे सेटिंग करावे, असे शिरगावकर यांनी नमूद केले आहे.

- Lockdown : 'होय, आपण संसर्गाच्या मोठ्या टप्प्यावर'; आरोग्य खात्याचा इशारा!

दुसरीकडे, पुरंदर आणि भोर तालुक्यातील नागरिकांनीही लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल, अफवा पसरेल, असे मेसेज सोशल मिडीयाद्वारे पाठवू नयेत. संचारबंदीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करू नये, असे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. देशावर कोरोनाचे संकट असताना अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पोलिस उपअधीक्षक जाधव यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Police warns about Dont send any rumor message on the occasion of April Fool Day