MSEDCL Strike : वीज कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचा बॅकअप प्लॅन रेडी

पुणे जिल्ह्यातील पुरवठा राहणार सुरळीत
maharashtra power sector employees strike today Alternative arrangements in Pune
maharashtra power sector employees strike today Alternative arrangements in Punesakal

पुणे : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडळ अंतर्गत आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यांमध्ये सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

या संपाच्या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडलामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून आपत्कालीन व्यवस्था उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनुसार पुणे परिमंडलस्तरावर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्रोत कर्मचारी, महावितरणचे अप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

तसेच शासनाच्या विविध विभागातील सेवानिवृत्त विद्युत अभियंता व तांत्रिक कर्मचारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक कार्यालयामधील विद्युत अभियंता व कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व विद्यार्थी यांच्याशी संपर्क करण्यात आला असून त्यांचे सहकार्य मिळणार आहे.

राज्य सरकारकडून मेस्मा कायदा लागू

संपाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा 2017 मधील (मेस्मा) तरतुदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत.

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण होईल, याबाबत कार्यवाही करण्याबाबत राज्य सरकारने निर्देश दिले आहेत.

तक्रारी असल्यास येथे संपर्क साधा

वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तेथे संपर्क करावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com