

Pune to Get Comprehensive Water Master Plan Through 2047 Amid Rising Demand
esakal
-प्रज्वल रामटेके
पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागाची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि विस्तारत जाणारे क्षेत्र लक्षात घेता, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी थेट २०४७ सालापर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने सर्व संबंधित संस्थांच्या समन्वयातून ‘सर्वसमावेशक आराखडा’ (मास्टर प्लॅन) तयार करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतीच्या सिंचनावरील ताण कमी करण्यासाठी नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यावर या आराखड्यात विशेष भर दिला जात आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे मंडळातर्फे देण्यात आली आहे.