
Finance Department halts Maharashtra professor recruitment citing irregularities; orders detailed report on vacant posts.
Sakal
-मीनाक्षी गुरव
पुणे: राज्यातील प्राध्यापकांच्या जवळपास ११ हजार जागा रिक्त असताना, प्रत्यक्षात राज्य सरकारमार्फत केवळ ४७.२७ टक्के म्हणजेच जवळपास पाच हजार २०० जागांच्या भरतीसाठी हालचाली सुरू आहेत. अशातच एकीकडे उच्च शिक्षण विभागाच्या वतीने प्राध्यापक भरतीस मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जात आहे, तर दुसरीकडे वित्त विभागाकडून सातत्याने यात त्रुटी काढल्या जात आहेत. परिणामी पुन्हा एकदा प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.