विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुधारली 'ती' चूक

महेश जगताप
Friday, 10 July 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रेफरन्स लिंक देत उमेदवारांना पाहिजे त्या पदासाठी प्राधान्य देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी हा बदल स्वागतार्ह असल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रेफरन्स लिंक देत उमेदवारांना पाहिजे त्या पदासाठी प्राधान्य देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी हा बदल स्वागतार्ह असल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गेल्या काही दिवसापूर्वी लागलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालांमध्ये अनेक उमेदवारांची पुन्हा त्याच पदी त्यांची निवड झाली होती. यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. येत्या काही दिवसात महाराष्ट्र वनसेवा गट क्रमांक, प्रथम, द्वितीय श्रेणीच्या पदासाठी मुलाखती होणार आहेत व मुलाखती होणाऱ्या ५०हून अधिक उमेदवार हे राज्यसेवेच्या परीक्षामध्ये उत्तीर्ण असलेले द्वितीय श्रेणीच्या पदावरती काम करत आहेत. त्यामुळे आयोगाने पदांना प्राधान्यक्रम देण्यासाठी पर्याय द्यावा अशी मागणी वन सेवेच्या मुलाखतीला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली होती.
-------------
विकास दुबेच्या एनकाउंटरवर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया; म्हणाल्या....
-------------
विकास दुबे एनकाऊंटरमध्ये गेला पण.... हे १० प्रश्न अनुत्तरितच !
-------------
निर्माण झालेल्या या वादामुळे विनाकारण नवीन विद्यार्थ्यावर याचा परिणाम होतो व त्यामुळे त्यांची संधी जाते. म्हणून, कित्येक वर्ष विद्यार्थी अभ्यास करीत असतात कधीतरी संधी येते आणि अशा मार्गाने जात त्याचा उपयोग नसल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यामुळे आयोगाने यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना पदासाठी प्राधान्य देण्याचे पर्याय ठेवले पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती.

आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र वनसेवेच्या मुलाखत कार्यक्रम जाहीर केला आहे. पण, त्या यादीमध्ये राज्यसेवा परीक्षेतून गट 'ब' या पदावर निवड झालेले बरेच उमेदवार आहेत. सदर उमेदवारांनी वनसेवा परीक्षेसाठी गट 'अ' आणि गट 'ब' अशा दोन्ही पदांचे पसंतीक्रम दिले आहेत. पण, आता त्यांच्या इच्छानुसार ते  फक्त वनसेवेतील गट 'अ' पदाकरिता पसंतीक्रम देऊ शकतात. यामुळे 'या' झालेल्या बदलाने उमेदवाराची दोन पदांवर निवड होऊ शकणार नाही आणि अन्य उमेदवारांवरती संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Public Service Commission corrects his mistake