Maharashtra Temples Reopen : संत ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन सुरु

राज्य सरकारच्या ब्रेक द चेन च्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधीचे मुख दर्शन आज सकाळी सहा वाजल्यापासुन सुरु झाले
Maharashtra Temples Reopen
Maharashtra Temples Reopensakal News

आळंदी : राज्य सरकारच्या ब्रेक द चेन च्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधीचे मुख दर्शन आज सकाळी सहा वाजल्यापासुन सुरु झाले. ग्रामस्थ वारकर्‍यामधे दर्शनासाठी उत्साह होता. सेनेने मास्क सॅनिटायझर वाटप केले.तर भाजपाने महाद्वारात भजन करुन दर्शन सुरु झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला.

Maharashtra Temples Reopen
भारताचा जवळचा मित्र रशियाची तालिबानला साथ

सकाळपासुन देवुळवाड्याच्या पंखा मंडपातून केवळ मुख दर्शनाची सोय पाच टप्प्यात ठेवली. दोन भाविकांमधे सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापरबाबत देवस्थानच्यावतीने दर्शनबारीत भक्ताचे जनजागृती केली जात होती. प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्कॅनिंग आणि सॅनिटायझरची सोय आळंदी देवस्थानने केली.

मंदिराच्या पश्चिम बाजूकडील आजोळघराच्या दर्शनबारीतून मंदिरात प्रवेश देण्यात येत होता.. तर पान दरवाजातून बाहेर पडण्याची व्यवस्था होती. दोन्ही दरवाजावर पोलिस तसेच देवस्थानचे शिपाई आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील सर्व मंदिरे भाविक भक्तांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली हा आनंदोत्सव भारतीय जनता पार्टी आळंदी शहराच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर महाद्वार येथे भजन व आरती करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी भारतीय जनता पार्टी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षावैजयंता उमरगेकर, प्रदेश कोषाध्यक्षा शैला मोळक, आध्यात्मिक आघाडी पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय घुंडरे, आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, नगरसेवक प्रशांत कुर्हाडे, सागर भोसले, गुलाब खांडेभराड, पांडुरंग ठाकुर, प्रीतम शिंदे, संदेश जाधव, बंडुनाना काळे, सदाशिव साखरे, ज्ञानेश्वर बनसोडे, अॅड.आकाश जोशी, प्रमोद बाफना, चारूदत्त प्रसादे, संपत बवले, भागवत काटकर, हभप महाराज गजानन पवार, ज्ञानेश्वर जाधव, विश्वंभर वाळके, सुभाष म्हस्के, गजानन पिंपळे, मांडगे महाराज, अमोल जाधव उपस्थित होते.

Maharashtra Temples Reopen
सणांच्या तोंडावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

आळंदी शहर शिवसेना व युवासेना यांच्यावतीने मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना मास्क वाटप केले व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त डॉ अभय टिळक, योगेश देसाई तसेच आशिष गोगावले, अमित डफळ, मंगेश तिताडे, निखिल तापकीर, योगेश पंडित, तुकाराम माने , ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक माऊली वीर हे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com