esakal | Temple Reopen : सासवड येथील संत सोपानदेव मंदिर भाविकांसाठी केले खुले
sakal

बोलून बातमी शोधा

sopandev maharaj

Temple Reopen : सासवड येथील संत सोपानदेव मंदिर भाविकांसाठी केले खुले

sakal_logo
By
दत्ता भोंगळे

सासवड शहर : सासवड येथील संत सोपानदेव मंदिर कोरोनाच्या कालावधीपासून बंद होते. पण शासनाने आज ७ आक्टोंबर पासून मंदिरे खुले करण्याचे आव्हान केल्यानंतर मंदिराचे मुख्य विश्वस्त त्रिगुण गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व मंदिराचे व्यवस्थापक हिरुकाका गोसावी यांच्या उपस्थित मंदिरात विविध पुजा व कलशाची विधीवत पूजा करीत मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

हेही वाचा: अजित पवारांचा मुलगा पार्थच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सचा छापा

सासवड ( ता. पुरंदर ) येथे संत सोपानदेव मंदिराच्या मुख्यदरवाजाचे पूजन करून दरवाजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या दरवाजातुन आत प्रवेश करीत मंदिराचा दरवाजा उघडला. नंतर मंदिराच्या सभागृहात या भागाचे नगरसेवक संजय गणपत जगताप यांच्या हस्ते कलश पूजन, मंदिरातील आतील दरवाजास पुष्पहार अर्पण करीत, समाधीचे विधीवत पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग होऊन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच मंदिरात पेढे वाटून केला भाविकांनी आनंद व्यक्त करण्यात आला.

या अगोदर सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची स्वच्छता करण्यात आली होती. आज सॅनिटायझर व स्वच्छतेचा कडे लक्ष देत भाविकांनी मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी नगरसेवक संजय ग. जगताप, माजी उपनगराध्यक्ष रामभाऊ वढणे, ह.भ.प. गणेश महाराज राऊत, ह.भ.प. सखाराम लांडगे, ह.भ.प. सुधाकर गिरमे, नंदकुमार दिवसे, राजेंद्र लांडगे, चंद्रकांत गिरमे, मोहन उरसळ, ओम भोईर, प्रवण कामठे, यश इभाड, विशाल इभाड, विणेकरी शिवाजी जगताप व दत्ता वायाल आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस भाविक संत सोपानदेवांच्या दर्शनापासून वंचीत होते. पण शासनाने जरी आज परवानगी दिली असली तरी मंदिरात स्वच्छतेचे नियम आपण पाळणे बंधनकारक आहे, असे नगरसेवक संजय ग. जगताप यांनी सांगितले.

loading image
go to top