अजित पवारांचा मुलगा पार्थच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सचा छापा

मुंबईतील नरिमन पॉईंटच्या कार्यालयावर छापेमारीची कारवाई केली आहे.
Parth pawar
Parth pawar

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (ajit pawar) संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आज इन्कम टॅक्सने छापेमारीची (income tax raid) कारवाई केली. संध्याकाळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार (parth pawar) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा मारला आहे. मुंबईतील नरिमन पॉईंटच्या कार्यालयावर छापेमारीची कारवाई झाली आहे. अजित पवार आणि त्यांच्या 3 बहिणीच्या कारखान्यांवर सकाळपासून छापेमारीची कारवाई सुरु आहे. त्या बद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अजित पवार काय म्हणाले....

"छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे. मी कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही" असे अजित पवार म्हणाले. "आयकर खात्याला शंका असेल, तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित काही कंपन्यांवर छापेमारी झाली. मी स्वत: राज्याचा अर्थमंत्री आहे. त्यामुळे मी माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांचा दरवर्षी नियमितपणे टॅक्स भरतो. राजकीय हेतुने इन्कम टॅक्सने छापा मारला की, त्यामागे आणखी काय हेतु होता? ते इन्कम टॅक्सचं सांगू शकते" असे अजित पवार म्हणाले.

Parth pawar
भारताचा जवळचा मित्र रशियाची तालिबानला साथ

"मी पण एक नागरिक आहे. माझ्या बहिणींची ३५-४० वर्षांपूर्वी लग्न झाली. त्या त्यांच्या घरी चांगला संसार करत आहेत. माझ्या तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवर धाडी टाकल्या. त्यामागचं कारण मला समजू शकलेलं नाही. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल, तर राज्यातील जनतेला विचार केला पाहिजे. कुठल्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातोय. याचा राज्यातील जनतेने विचार करावा" असे अजित पवार म्हणाले.

मुंबईतील नरिमन पॉईंट येथील पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आली होती. आयकर विभागाच्या ७-८ जणांच्या टीमकडून पार्थ पवारांच्या सीईट्री नावाच्या कार्यालयावर आज सकाळी ६ वाजता ही कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने जवळपास १२ तास चौकशी केली असून, काही कागपत्र देखील अधिकारी घेऊन गेल्याचे सांगण्यात येते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com