Tukaram Maharaj Palkhi Leaves Pune
esakal
पुणे : दोन दिवस टाळ-मृदंगाच्या निनादाने, हरिनामाच्या अखंड गजराने आणि वारकऱ्यांच्या सेवाभावाने भारावून गेलेल्या पुण्यनगरीने रविवारी सकाळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला निरोप (Tukaram Maharaj Palkhi leaving Pun) दिला. सकाळच्या वातावरणात ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या अखंड जयघोषात दोन्ही पालखी सोहळे पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाले.