

Revenue Minister Vows Action Against Corrupt Officials
Sakal
पुणे : सरकारी जागेच्या विक्रीचा व्यवहार करता येत नाही. तरीही सरकारी जागा विकली गेली, आमच्या अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्ड का तपासले नाही, हे गंभीर आहे. चुकीचे काम केलेल्या अधिकाऱ्यांना घरी पाठवणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महसूल खात्याचे मुख्य सचिव विकास खारगे यांची समिती नेमली आहे. ते निःपक्षपणे चौकशी करतील, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.