Maharashtra Rural Livestock Entrepreneurship Scheme
sakal
औंध : ग्रामीण भागातील युवक, युवती आणि शेतकऱ्यांना पशुधन व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’चा संविधान दिनानिमित्त गुरुवारी (ता. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या योजनेसाठी सायंकाळी चार वाजल्यापासून महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.