Sahitya Parishad: साहित्य परिषदेच्या दारी राजकीय आखाडा ,दोन्ही गटांना राजकीय पाठबळ असल्याची साहित्य वर्तुळात चर्चा

Maharashtra Sahitya Parishad Dispute: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील सत्तासंघर्षामुळे कार्यालयात तणावाचे वातावरण; दोन्ही गटांना राजकीय पाठबळ असल्याची साहित्य वर्तुळात चर्चा, पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप.
Police personnel deployed outside the Maharashtra Sahitya Parishad office in Pune amid tensions between two groups.

Police personnel deployed outside the Maharashtra Sahitya Parishad office in Pune amid tensions between two groups.

esakal

Updated on: 

पुणे,: साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींचे व्यासपीठ असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतील सत्तासंघर्षामुळे शनिवारी परिषदेच्या कार्यालयाने राजकीय आखाड्याचे स्वरूप धारण केले. या संघर्षात दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या राजकीय गटांचे पाठबळ मिळत असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात होती. त्याचे पडसाद शनिवारी ‘मसाप’च्या कार्यालयातही उमटले. कडेकोट पोलिस बंदोबस्त, बंद दरवाजा, कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि संध्याकाळी दोन्ही गटांमध्ये निर्माण झालेला तणाव, यामुळे परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते.

Loading content, please wait...