Maharashtra Scholarship Exam Date Rescheduled
Sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीची आठ फेब्रुवारीला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २२ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) आठ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित केली होती. परंतु केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देखील आठ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे.