

Maharashtra School Education News Sanskrit Development Grants and Other Special School Schemes Discontinued by Government
sakal
पुणे : अनेक वर्षांपासून कोणताही निधी खर्च न झाल्याने आणि प्रस्तावच येत नसल्याने केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या ‘पाठशाळा व संस्कृत विकासासाठी अनुदाने’ आणि ‘इतर विशेष शाळा’ या दोन योजना अखेर बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. योजनांचे सुसूत्रीकरण आणि प्रशासकीय सुलभीकरणाचा भाग म्हणून कालबाह्य झालेल्या या योजना बंद करण्यात आल्या आहेत.