

Real Estate Boom Drives Maharashtra Stamp Duty Revenue to 21928 Crore in First Four Months of Financial Year 2026 27
sakal
पुणे : राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाला चालू आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) पहिल्या चार महिन्यांत २१ हजार ९२८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मागील वर्षाच्या तुलनेत तीन हजार २५० कोटी (१७ टक्के) रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली. वार्षिक मूल्यदर तक्त्यातील (रेडी-रेकनर) दरात कोणताही बदल न करता उत्पन्नात ही वाढ झाली.