esakal | दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी दिली मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Students

शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्री-लिस्ट चार फेब्रुवारीपर्यंत जमा करायची आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी दिली मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेस वरून नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत होती. मात्र आता राज्य मंडळाने ही आवेदनपत्रे भरण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

त्यामुळे विद्यार्थ्यांना या तारखेपर्यंत नियमित शुल्कासह आवेदनपत्रे भरता येणार आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) "ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट' घेणारे विद्यार्थी याची आवेदनपत्रे देखील माध्यमिक शाळांनी याच कालावधीत भरायची आहेत.

'मूर्ती लहान, कीर्ती महान' व्यक्तिमत्व; जाणून घ्या लाल बहादूर शास्त्रींबद्दलच्या १० गोष्टी​

माध्यमिक शाळांना चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बॅंकेत शुल्क भरण्यासाठी एक फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्री-लिस्ट चार फेब्रुवारीपर्यंत जमा करायची आहे. दहावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत ही आवेदनपत्रे भरायची आहेत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे. 

पुणे : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन्ही युवकांचा मृत्यू​

यावर्षी नव्याने फॉर्म नंबर 17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची 2021मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्‍चित केला जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता दिलेल्या कालावधीत आवेदनपत्रे भरू नयेत, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे. मार्च-2020 किंवा नोव्हेंबर-डिसेंबर 2020मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच 2021मध्ये श्रेणीसुधार योजनेतंर्गत आवेदनपत्र भरून परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षा देता येणार नाही, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)