
पंडित नेहरुंच्या निधनानंतर मे १९६४ मध्ये ते पंतप्रधान बनले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी गृह मंत्रालय आणि रेल्वे ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती.
Lal Bahadur Shastri Death Anniversary: 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' असं ज्यांच्याविषयी म्हटलं जातं, ते स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज ५५वी पुण्यतिथी. एक महान स्वातंत्र्यसेनानी आणि राजकारणी व्यक्तिमत्व. शास्त्रींनी दिलेला 'जय जवान, जय किसान'चा नारा देशावर मोठा परिणाम करणारा ठरला.
शास्त्रींनी आपल्या व्यक्तिमत्वाने देशाच्या राजकारणात अमीट छाप सोडली. साधी राहणी, नम्र आणि मवाळ भाषा पण कणखर बाणा आणि सामान्य माणसाशी जोडलेली नाळ यामुळे शास्त्रींचा देशातील अद्वितीय नेत्यांमध्ये समावेश होतो. पंडित नेहरुंच्या निधनानंतर मे १९६४ मध्ये ते पंतप्रधान बनले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी गृह मंत्रालय आणि रेल्वे ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती.
- चीनमुळं काही अडणार नाही; भारतातच सापडला मौल्यवान खनिज साठा
शास्त्रींविषयीच्या प्रेरणादायी गोष्टी -
१. जेव्हा महात्मा गांधींनी देशवासियांनी असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते, तेव्हा लाल बहादूर शास्त्री केवळ १६ वर्षांचे होते. आणि लगेच त्यांनी चळवळीत सहभागी होण्याचा निर्धार केला.
२. शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींचा खूप प्रभाव होता. 'कठोर परिश्रम हे प्रार्थनेइतकेच महत्त्वाचे असते,' असं ते एकदा म्हणाले होते.
३. १९६५ च्या भारत-पाक युद्धावेळी जेव्हा देशाला अन्नटंचाईचा सामना करावा लागला होता, तेव्हा शास्त्री देशाचे पंतप्रधान होते. आणि त्यांनी आपल्या पदासाठी मिळणारा पगार घेणे बंद केले होते.
- कृषी कायद्यांना स्थगिती द्या, समिती नेमा; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं
४. १९६५च्या युद्धावेळी शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. आणि त्यांनी दिलेल्या या नाऱ्यामुळे युद्ध आणि अन्नटंचाईच्या परिस्थितीतही सैनिक आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढले. आणि आपण युद्धही जिंकले.
५. शास्त्रींच्या प्रामाणिकपणाचे अनेक दाखले दिले जातात. शास्त्री जेव्हा रेल्वेमंत्री होते, तेव्हा एका रेल्वे अपघातात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. आपण या अपघातासाठी जबाबदार असल्याने त्यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
६. शास्त्रींनी आपल्या कार्यकाळात श्वेत क्रांतीला प्रोत्साहन दिले. दूध उत्पादन वाढविण्यासाठी देशव्यापी मोहीम त्यांनी राबविली होती. गुजरातच्या आनंद येथील अमूल दूध सहकारी संस्थेने त्यांना पाठिंबा दर्शवत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना केली होती.
- गलवान खोऱ्यात हुतात्मा जवानांचा प्रजासत्ताक दिनी होणार गौरव
७. देश अन्नधान्याने समृद्ध व्हावा, यासाठी १९६५ मध्ये हरित क्रांतीचा पायाही शास्त्रींनी रचला. ज्यामुळे पंजाब, हरयाना आणि उत्तर प्रदेशमधील अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली.
८. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ फक्त १९ महिन्यांचा होता. ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे त्यांचे निधन झाले.
९. "खरी लोकशाही किंवा जनतेचे स्वराज कधीही अविश्वासू आणि हिंसक मार्गाने येऊ शकत नाही, कारण दडपशाही किंवा भ्रष्टाचारी प्रवृत्तीला यामुळे दूर ठेवता येतं, अशी भूमिका शास्त्रींची होती.
१०. "प्रत्येक देशाच्या जीवनात अशी वेळ येते, जेव्हा इतिहासाच्या चौकात उभे राहून आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे, ते निवडावे लागते," अशी शास्त्रींची धारणा होती.
- देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)