Teacher unions demanded withdrawal of restrictive education policies and warned of intensified protests if their long-pending demands remain unresolved.
Sakal
शिरूर : नवीन भरतीसह जुन्या शिक्षकांनाही शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक केल्याच्या अन्याय्य निर्णयासह पदोन्नती विषयक जाचक अटी, संच मान्यतेचे चुकीचे धोरण आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कामाच्या सक्तीच्या त्रासाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी गुरूवारी येथील तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या दिला. न्याय्य हक्कांसाठीच्या या धरणे आंदोलनात शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.