TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

Alleged TET Paper Leak Mastermind Bijendra Gupta Arrested in Bihar : महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणातील कथित मास्टरमाईंड बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक करण्यात आली असून भिवंडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
TET Paper Leak

TET Paper Leak

Esakal

Updated on

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले असून या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला पुणे विमानतळावर आणले असून, तेथून त्याला पुढील चौकशीसाठी भिवंडी येथे नेण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासात यापूर्वीच तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासाची दिशा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com