आंबेगावात वळसे पाटलांचीच हवा | Election Results 2019 

walse patil1.jpg
walse patil1.jpg

पारगाव : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप वळसे पाटील एक लाख 26 हजार 120 मते घेऊन विरोधी शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्यापेक्षा 66 हजार 775 मतांच्या मताधिक्‍याने सातव्यांदा विधानसभेवर निवडून आले. राजाराम बाणखेले यांना 59 हजार 345 मते पडली. 

पहिल्या फेरीपासूनच दिलीप वळसे पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरवात केली होती. पहिल्या फेरीत वळसे पाटील यांना 3128 मते मिळाली, तर बाणखेले यांना अवघी 391 मते पडली. पोस्टाने आलेल्या मतांमध्ये वळसे पाटील यांना 549 मते मिळाली, तर बाणखेले यांना 133 मते पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. 

वळसे पाटील यांचे दुपारी दोनच्या सुमारास मतमोजणीच्या ठिकाणी आगमन झाले. त्या वेळी प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यांच्यासमवेत मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, विष्णू हिंगे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे आदी नेते होते. 

बहुजन समाज पक्षाचे रवींद्र चव्हाण यांना 1137 मते मिळाली, राइट टू रिकॉल पार्टीचे विशाल ढोकले - 308, भारतीय नवजवान पक्षाचे संजय पडवळ - 272 व अपक्ष अनिता गभाले यांना 1234 मते मिळाली. नोटाला 1616 मते पडली, तर पोस्टल मतदानात 115 मते बाद झाली. 

...आणि देवदत्त निकमांचा संकल्प पूर्ण 
मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिलीप वळसे पाटील हे विक्रमी मताधिक्‍क्‍यासह विजय संपादन करून सातव्यांदा विधानसभेला निवडून येईपर्यंत चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. त्यांनी अनवाणी फिरून प्रचार केला. मागील सहाही निवडणुकीत मताधिक्‍क्‍य चढत्या क्रमाने वाढत गेले. या वेळी ते 66 हजार 775 वर गेले. म्हणजे निकम यांचा संकल्प पूर्ण झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com