पुणे जिल्हा : दोन्ही राज्यमंत्री पराभवाच्या छायेत | Election Results 2019

shivtare- bhegde
shivtare- bhegde

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने होमपीच असलेल्या पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात दुपारी बारापर्यंतच्या निकालात जोरदार मुसंडी मारली असून, भाजपचे राज्यमंत्री असलेले बाळा भेगडे हे मावळमधून, तर शिवसेनेचे राज्यमंत्री असलेले विजय शिवतारे हे पुरंदरमधून पिछाडीवर पडले आहेत. विशेष म्हणजे महाआघाडीच्या जागा वाटपात दोन जागा मिळालेली काॅंग्रेस दोन्ही जागांवर आघाडीवर आहे. पक्षांतर केलेल्या माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अजून तरी विजय दूर दिसत आहे. 

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दहा मतदारसंघ आहेत.मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तीन जागांवर विजयी झाली होती, तर काॅंग्रेस फक्त एका जागेवर विजयी होती. आता महाआघाडीच्या जागा वाटपात आठ जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसला, तर दोन जागा काॅंग्रेसला मिळाल्या आहेत. त्यातील दोन्ही जागांवर काॅंग्रेस आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, भाजपचे बाळा भेगडे व शिवसेनेचे विजय शिवतारे हे हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात असलेले राज्यमंत्री पराभवाच्या छायेच गेले आहेत. महगायुतीला हा फार मोठा झटका आहे. फक्त दौंडमधील जागेवर भाजपचे राहुल कुल यांनी आघाडी घेतली आहे. येथे राष्ट्रवादीचे रमेश थोरात मागे पडले आहेत.  

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे अतुल बेनके व शिवसेनेचे शरद सोनवणे, भोरमध्ये काॅंग्रेसचे संग्राम थोपटे व शिवसेनेचे कुलदीप कोंडे, शिरूरमध्ये भाजपचे बाबूराव पाचर्णे व राष्ट्रवादीचे अशोक पवार, इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील व भाजपचे हर्षवर्धन पाटील़ तर खेडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते व अपक्ष अतुल देशमुख यांच्यात जोरदार लढत चालू आहे. या सर्व ठिकाणी महाआघीडीचे उमेदवार पुढे आहेत.   

जिल्ह्यातील 2014 मधील पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी कॉंग्रेस- 3
भाजप- 2
शिवसेना- 2
कॉंग्रेस- 1
मनसे- 1
रासप- 1
..........
2019 मध्ये लढविलेल्या पक्षनिहाय जागा

राष्ट्रवादी कॉंग्रेस- 8
कॉंग्रेस- 2
भाजप- 5
शिवसेना- 5
.....................
जिल्ह्यातील 2014 मधील प्रमुख लढती

जुन्नर- शरद सोनवणे (मनसे), आशा बुचके (शिवसेना), अतुल बेनके
(राष्ट्रवादी कॉंग्रेस)
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस), अरुण गिरे
(शिवसेना), जयसिंग एरंडे (भाजप)
खेड- सुरेश गोरे (शिवसेना), दिलीप मोहिते (राष्ट्रवादी कॉंग्रेस), शरद
बुट्टे पाटील (भाजप)
शिरूर- बाबूराव पाचर्णे (भाजप), अशोक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस),
दौंड- राहुल कुल (रासप), रमेश थोरात (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
इंदापूर- दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), हर्षवर्धन पाटील (कॉंग्रेस)
बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस), बाळासाहेब गावडे (भाजप)
पुरंदर- विजय शिवतारे (शिवसेना), संजय जगताप (कॉंग्रेस), अशोक टेकवडे
(राष्ट्रवादी कॉंग्रेस)
भोर- संग्राम थोपटे (कॉंग्रेस), कुलदीप कोंडे (शिवसेना), विक्रम खुटवड
(राष्ट्रवादी कॉंग्रेस)
मावळ- बाळा भेगडे (भाजप), माउली दाभाडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
...........
जिल्ह्यातील 2019 मधील प्रमुख लढती

जुन्नर- शरद सोनवणे (शिवसेना), आशा बुचके (शिवसेना बंडखोर), अतुल बेनके
(राष्ट्रवादी कॉंग्रेस)
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस), राजाराम बाणखेले (शिवसेना)
खेड- सुरेश गोरे (शिवसेना), दिलीप मोहिते (राष्ट्रवादी कॉंग्रेस), अतुल
देशमुख (भाजप बंडखोर)
शिरूर- बाबूराव पाचर्णे (भाजप), अशोक पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस),
दौंड- राहुल कुल (भाजप), रमेश थोरात (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
इंदापूर ः दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), हर्षवर्धन पाटील (भाजप)
बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस), गोपिचंद पडळकर (भाजप)
पुरंदर- विजय शिवतारे (शिवसेना), संजय जगताप (कॉंग्रेस)
भोर- संग्राम थोपटे (कॉंग्रेस), कुलदीप कोंडे (शिवसेना), आत्माराम कलाटे
(शिवसेना बंडखोर)
मावळ- बाळा भेगडे (भाजप), सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com