पिंपरी-चिंचवडमधून आण्णा बनसोडे महेश लांडगे आघाडीवर Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पिंपरी - पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार आण्णा बनसोडे यांनी भाजपचे उमदेवार गौतम चाबुकस्वार यांना पिछाडीवर टाकले आहे. बनसोडे यांना 1600 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे पिंपरीत राष्ट्रवादीच्या विजयाची आशा आहे.

राष्ट्रवादी – आण्णा बनसोडे 33256
शिवसेना – गौतम चाबुकस्वार 31623
वंचित – प्रविण गायकवाड 3398

भोसरीत लांडगे यांची विजयाच्या दिशेने घौडदौड
११ व्या फेरी अखेर भोसरीत भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू केली असून त्यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्यावर तब्बल ३९४६० मताधिक्य मिळविले आहे. 

११ व्या फेरीत लांडगे यांना ८०८६, लांडे यांना ३,६८० मते पडली. या फेरी अखेर लांडगे यांच्या झोळीत मतदारांनी एकूण ८४,०९५ मते टाकली आहेत. लांडगे आणि लांडे यांच्यातील मतांचा फरक वाढतच चालला असून त्यांनी विजयाच्या दिशेने घौडदौड चालू केली आहे. या फेरी अखेर लांडे यांना ४४,६३५ मते प्राप्त करता आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra vidhan sabha 2019 election result pimpri anna bansode bhosari mahesh landage