Vidhan Sabha 2019 : भोसरी : शहरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार

भोसरी - महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ त्रिवेणीनगर, तळवडे, रुपीनगर भागात आयोजित कोपरा सभांमध्ये बोलताना महापौर राहुल जाधव.
भोसरी - महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ त्रिवेणीनगर, तळवडे, रुपीनगर भागात आयोजित कोपरा सभांमध्ये बोलताना महापौर राहुल जाधव.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘तत्कालीन राजकर्त्यांकडे असलेल्या दूरदृष्टीच्या अभावामुळे पिंपरी- चिंचवडसाठी आंद्रा भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याची योजना केवळ कागदावर राहिली होती. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळे प्रकल्प मार्गी लागला आहे,’’ असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी येथे केले.

भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ त्रिवेणीनगर, तळवडे, रुपीनगर भागात कॉर्नरसभा झाल्या, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, भाजप महिला आघाडीच्या पिंपरी- चिंचवड अध्यक्षा शैला मोळक, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर, अरुणा भालेकर, गोपाळ भालेकर, शरद वसंत भालेकर, एस. डी. भालेकर उपस्थित होते.

चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजित भामा आसखेड प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगून महापौर जाधव म्हणाले, ‘‘येत्या दीड वर्षात प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मतदारसंघातील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल. पहिल्या टप्प्यात शंभर एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प, दुसऱ्या टप्प्यात दोनशे एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे.

चिखलीत आठ हेक्‍टर क्षेत्र जलशुद्धीकरण केंद्रासाठी महापालिकेने ताब्यात घेतले आहे. येथे तीनशे दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे प्रस्तावित आहे. चिखली प्रभाग क्र. एक येथे आंद्रा भामा आसखेड प्रकल्पांतर्गत शंभर दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी १२२ कोटी रुपये खर्च आहे. या कामाचे भूमिपूजन सात सप्टेंबरला केले आहे. रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी लांडगे यांनी केलेल्या प्रयत्नांची माहितीही या वेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com