Vidhan Sabha 2019 : खर्च सादर न केल्यावरून चार उमेदवारांना नोटिसा

Election-Commission-Office
Election-Commission-Office

विधानसभा 2019 : पिंपरी - शहरातील तीन मतदारसंघांतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांपैकी चौघांनी पहिल्या टप्प्यात उमेदवारी खर्च न दिल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यात पिंपरीतील तीन आणि भोसरीतील एका उमेदवाराचा समावेश आहे. 

निवडणूक खर्च सादर करण्यासाठी शुक्रवारी (ता. ११) सुनावणी घेण्यात आली. त्यात पिंपरी मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या अठरापैकी तिघा उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. भोसरीतून बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यापैकी एका उमेदवाराने आजारी असल्याने निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली होती. आता या उमेदवाराने खर्चाचा तपशील सादर केला आहे. चिंचवड मतदारसंघातील सर्व म्हणजे अकरा उमेदवारांनी पहिल्या टप्प्यात खर्चाचे सादरीकरण केले आहे.

निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना मंगळवार (ता. १५) आणि शनिवार (ता. १९) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक खर्च द्यावा लागणार आहे. त्या वेळी खर्चाचा तपशील न देणाऱ्या उमेदवारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून ४१ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com