Vidhan Sabha 2019 : चिंचवड : पाण्यासाठी पुढील ५० वर्षांचे नियोजन - संदीप कस्पटे

वाकड - महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत नगरसेवक संदीप कस्पटे, विनायक गायकवाड व रहिवासी.
वाकड - महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत नगरसेवक संदीप कस्पटे, विनायक गायकवाड व रहिवासी.

विधानसभा 2019 : पिंपरी - वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी पुढील ५० वर्षांचे नियोजन करून कामे सुरू करण्यात आली आहेत. भामा-आसखेड, आंद्रा आणि पवना या धरणांतून शहरासाठी ४०० एमएलडी पाणी सरकारने मंजूर केले आहे. हे पाणी आणण्याच्या कामांना सुरवात झाली आहे. त्यातून शहराच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती भाजप नगरसेवक संदीप कस्पटे यांनी दिली.

चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ वाकड येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.  

कस्पटे म्हणाले, ‘‘महापालिकेमार्फत पवना धरणातून पिण्याच्या पाण्याचा दररोज पुरवठा केला जातो. पवना नदीवर रावेत येथे असलेल्या बंधाऱ्याजवळून पाणी उचलून त्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी नागरिकांना विविध भागांतील पाण्याच्या टाक्‍यांमधून पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. राज्याच्या जलसंपदा खात्याने २०११ मध्ये पिंपरी-चिंचवडमधील १७ लाख लोकसख्येला पवना धरणातील एकूण पाणीसाठ्यांपैकी ३७९ एमएलडी एवढे पाणी मंजूर केले. गेल्या नऊ वर्षांत शहराची लोकसंख्या १० लाखांनी वाढल्यानंतरदेखील जलसंपदा खात्याने जेवढ्या पाण्याला मंजुरी दिली, तेवढेच म्हणजे ३७९ एमएलडी पाणीच आजच्या लोकसंख्येला पुरविले जात आहे. याचाच अर्थ १७ लाख लोकसंख्येसाठी मंजूर पाणी आज २७ लाख लोकांची तहान भागवत आहे. त्यामुळेच शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com