निवडणूक मतमोजणी ठिकाणी माध्यम प्रतिनिधींची गैरसोय Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 बालेवाडी येथील पिंपरी, चिंचवड, भोसरीसाठी असलेल्या माध्यम प्रतिनिधी कक्षात मोठी गैरसोय असल्याने प्रतिनिधींची तारांबळ उडाली. मुख्य मतदान कक्षाकडे माध्यम प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला. निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र असूनही केवळ निवडणूक प्रशासनाच्या समन्वयाअभावी माध्यमांना प्रवेश नाकारला. याबद्दल प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

माध्यम प्रतिनिधीना मुख्य कक्षात जाण्यास मज्जाव
पिंपरी - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 बालेवाडी येथील पिंपरी, चिंचवड, भोसरीसाठी असलेल्या माध्यम प्रतिनिधी कक्षात मोठी गैरसोय असल्याने प्रतिनिधींची तारांबळ उडाली. मुख्य मतदान कक्षाकडे माध्यम प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला. निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र असूनही केवळ निवडणूक प्रशासनाच्या समन्वयाअभावी माध्यमांना प्रवेश नाकारला. याबद्दल प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणुकीच्या कारभारात गैरसोय असून चालत नाही. डिजिटलच्या जमान्यात इंटरनेट सुविधा तसेच पायाभूत सुविधा (संगणक, प्रिंटर ) असणे अत्यावश्यक आहे. दुपारी बारा वाजले तरी इंटरनेट जोडणी माध्यम कक्षात मिळाली नाही. माध्यम प्रतिनिधीसाठी डिजिटल स्क्रीन उपलब्ध नाही. थेट कलेक्टर कार्यलयापर्यंत तक्रारी गेल्यावर यंत्रणा जागी झाली. नागरिक व माध्यमासाठी ध्वनिक्षेपक बसविण्यात आले. ते देखील उशिरा सुरू झाले. नंतर जोडणीसाठी तारांबळ उडाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Election Result Election Counting Place Media Reporter