Voting-Slip
Voting-Slip

Vidhan Sabha 2019 : धावपळीविना मिळवा मतदार चिठ्ठी

विधानसभा 2019 : पुणे - मतदार ओळख चिठ्ठ्या (व्होटर स्लिप) न मिळाल्याने अनेकदा मतदानापासून वंचित राहावे लागते. ही बाब टाळण्यासाठी आता निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला असून, प्रत्येक मतदारसंघातील मतदार चिठ्ठी कोठे उपलब्ध आहे अशा मतदान केंद्रांवरील संबंधित अधिकाऱ्यांच्या नावासह मोबाईल क्रमांकाची यादी जाहीर केली आहे. यामुळे या निवडणुकीत मतदानाचा टक्‍का वाढण्याची शक्‍यता आहे.

शहरासह जिल्ह्यात एकूण २१ मतदारसंघ असून, एकूण सात हजार ९२२ मतदान केंद्रे आहेत. यापूर्वी निवडणुकीत राजकीय पक्षांकडून मतदारांना व्होटर स्लिप दिल्या जात होत्या. परंतु, त्या बऱ्याचदा मिळत नाहीत.

कर्मचाऱ्यांकडूनही वेळेवर मतदार चिठ्ठ्या मिळत नव्हत्या, अशी तक्रार होती. त्यामुळे काही मतदारांकडून मतदानास टाळाटाळ केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांची नावे, तेथील सर्व अधिकारी, त्यांचे मोबाईल क्रमांक आणि यादी क्रमांक याला वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे आता मतदारांना मतदार यादीत नाव शोधताना ऐन वेळी धावपळ करावी लागणार नाही.

मतदानाचा टक्‍का वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मतदारांना मतदार चिठ्ठ्या मिळण्यास अडचणी येऊ नयेत, यासाठी संबंधित मतदान केंद्र अधिकाऱ्यांची नावे मोबाईल क्रमांकासह दिली आहेत. 
- नवल किशोर राम, जिल्हा निवडणूक अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com