Vidhan Sabha 2019 : इंदापूर : राजकीय समीकरणाने उत्कंठावर्धक लढत

मंगेश कोळपकर
Friday, 18 October 2019

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना पक्षाने इंदापुरातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्यापुढे आव्हान आहे ते त्यांना गतवेळी पराभूत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणेंचेच. पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे या भागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावला आहे, तर भरणे यांच्या मागे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी ताकद लावली आहे, त्यामुळे या लढतीबद्दल कुतूहल आहे.

विधानसभा 2019 : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांना पक्षाने इंदापुरातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्यापुढे आव्हान आहे ते त्यांना गतवेळी पराभूत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणेंचेच. पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे या भागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावला आहे, तर भरणे यांच्या मागे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी ताकद लावली आहे, त्यामुळे या लढतीबद्दल कुतूहल आहे.

हर्षवर्धन पाटील 
बलस्थाने

    इंदापूर तालुक्‍यातील राजकारणात २५ वर्षांपासून सक्रिय.
    तालुक्‍यातील अनेक सहकारी, शैक्षणिक संस्थांवर ताबा. 
    राष्ट्रवादीच्या अप्पासाहेब जगदाळेंसह काही गटांचा पाठिंबा. 

उणिवा
    सातत्याने राजकीय मारलेल्या कोलांटउड्या. 
    राष्ट्रवादीकडून गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव. 
    आघाडीत असतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कडवा विरोध. 

दत्तात्रेय भरणे
बलस्थाने

    गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात सातत्याने संपर्क. 
    नातेवाईक आणि भावकीचा मोठा आधार. 
    बारामती जवळ असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पाठबळ. 

उणिवा
    राष्ट्रवादीमधीलच काही गटांचा तीव्र विरोध. 
    मत्स्यबीज व्यावसायिकांचा प्रश्‍न सोडविण्यात अपयश. 
    गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात ठोस विकासकामे झाली नसल्याचा आरोप. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 indapur politics