Vidhan Sabha 2019 : सामान्यांना लुटणाऱ्यांची गय नाही - मुळीक

वडगाव शेरी - पदयात्रेत महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांचे स्वागत करताना नागरिक.
वडगाव शेरी - पदयात्रेत महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांचे स्वागत करताना नागरिक.

विधानसभा 2019 : वडगाव शेरी - ‘लोहगाव आणि इतर ठिकाणी घरांचे बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना धमकावून हप्ते वसूल करण्याचा प्रकार विरोधकांकडून जोरात सुरू आहे. गरिबांना लुटणाऱ्यांची गय करणार नाही,’’ असे मत आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले. 

वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार आमदार जगदीश मुळीक यांची प्रचारफेरी आज वडगाव शेरी, साईनाथनगर, राघोबा पाटील नगर, वृंदावननगर आणि गलांडेवस्ती या ठिकाणी झाली. या वेळी ते बोलत होते. नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे, नगरसेवक संदीप जऱ्हाड, नगरसेविका शीतल शिंदे, साधना भगत, सुधीर गलांडे; तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. 

मुळीक म्हणाले, ‘‘गेल्या महिन्यापासून घरांचे बांधकाम करणाऱ्यांना तुमचे घर पाडू, अशी दहशत दाखवली जाते. घर बांधणे हे नागरिकांचे स्वप्न असते. सामान्य माणसाला त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये वडगाव शेरी मतदारसंघ सुरक्षित केले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावले आहेत. चंदननगर, विमाननगर, विमानतळ आणि नगर रोड या ठिकाणी पोलिस स्टेशनचे काम केले आहे. पारदर्शक कारभार करणाऱ्याला लोक पुन्हा संधी देतील.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com