Vidhan Sabha 2019 : म्हणूनच अनेक नेत्यांचा झाला भाजपात प्रवेश!

BJP
BJP

विधानसभा 2019 : पुणे - आगामी महापालिका निवडणुकीत कोणाला नगरसेवकपदाची ‘डबल’ उमेदवारी, तर कोणाला ‘म्हाडा’पासून अण्णा भाऊ साठे महामंडळापर्यंतची विविध महामंडळे, केंद्र आणि राज्य सरकारच्या समित्यांमध्ये स्थान, यांसारख्या विविध पदांचे आमिष दाखवत शहर भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीला शहरात खिंडार पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी (ता. १७) होणाऱ्या सभेत आणखी काही जणांचे प्रवेश होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे आणि माजी आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, सदानंद शेट्टी, सुधीर जानजोत आदींनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

एकेकाळी शहरावर सत्ता गाजविणारा काँग्रेस पक्ष आता अडचणीत आला आहे. राष्ट्रवादीची अवस्था तुलनेत बरी आहे. याबाबत शहर भाजपचे सरचिटणीस गणेश बिडकर म्हणाले, ‘‘पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्यात आले आहे. पक्षात आल्यावर ते शिस्तीनुसार पक्षविस्तारासाठी नक्कीच काम करतील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com