Vidhan Sabha 2019 : राज्यात महायुतीला विजयी करा - आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

‘संपूर्ण महाराष्ट्रात भगवे वादळ आहे. स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करा, विरोधकांच्या आश्वासनाला बळी पडू नका,’’ असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. 

चाकण (ता. खेड) येथे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.

विधानसभा 2019 : चाकण - ‘संपूर्ण महाराष्ट्रात भगवे वादळ आहे. स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी युतीच्या उमेदवारांना विजयी करा, विरोधकांच्या आश्वासनाला बळी पडू नका,’’ असे आवाहन शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. 

चाकण (ता. खेड) येथे महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. 

ठाकरे म्हणाले, ‘‘आमदार सुरेश गोरे यांनी मतदारसंघात चांगले काम केले आहे. तालुक्‍याच्या विकासासाठी निधी आणला आहे. सत्तेत असलो तरी विविध प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठविला. शिवसेना शेतकऱ्यांचा, कामगारांचा सर्वांचा पक्ष आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी मोर्चा काढला. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार हा आमचा निर्धार आहे. शिवसेनेने विविध योजना आणायचे ठरविले आहे.’’

आमदार गोरे म्हणाले, ‘‘माझा विजय निश्‍चित आहे. विकासकामांच्या जोरावर मी निवडून येणार आहे. तालुक्‍याला शांततेची गरज आहे. तालुक्‍यात काहींनी प्रचारासाठी बोलके पोपट ठेवले आहेत. गुंडगिरी दहशतीचे राजकारण मोडून काढा.’’ 

या वेळी अशोक खांडेभराड, विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, जयप्रकाश परदेशी, संतोष डोळस, प्रकाश गोरे,  सूर्यकांत मुंगसे, गणेश पऱ्हाड, पांडुरंग गोरे, घनशाम दरोडे व इतरांनी विचार व्यक्त केले. या वेळी रामदास धनवटे, शिवाजी वर्पे, सुलभा उबाळे, राजू जवळेकर, किरण मांजरे, भगवान पोखरकर, ज्योती अरगडे, शेखर घोगरे, रोहिदास तापकीर, लक्ष्मण जाधव, रामहरी आवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पऱ्हाड यांनी केले. सुदाम कराळे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 mahayuti aaditya thackeray politics