Vidha Sabha 2019 : मावळ : राज्यमंत्र्यांमुळेच देहूरोडचा उड्डाण पूल

maharashtra vidhansabha 2019 Maval constituency Bala Bhegade Dehuroad  flyover
maharashtra vidhansabha 2019 Maval constituency Bala Bhegade Dehuroad flyover

विधानसभा 2019 

देहूरोड -  देहूरोड शहरामध्ये जुना पुणे-मुंबई महामार्गावर ९० कोटींचा उड्डाण पूल बांधला आहे. याकामी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पुढाकार घेतल्याने कमी वेळेत पूल मार्गी लागून वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटला, अशी भावना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी व्यक्त केली.

शेलार म्हणाले, ‘‘देहूरोड स्मशानभूमी, शहरातील अंतर्गत रस्ते, शेलारवाडी ते किन्हई रस्ता, पाण्याची योजना, बांधकाम योजना अशा अनेक योजनांचा आमच्या गावातील अनेक गरिबांना फायदा झाला आहे. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून रस्ते, स्मशानभूमी अशी अनेक विकासकामे वेगाने करण्यात आली, ज्यामुळे आमचे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे.’’

दरम्यान, गुरुवारी (ता. १७) सकाळी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे देहूरोड आणि शेलारवाडी परिसरात ढोल- ताशे आणि फटाक्‍यांच्या गजरात मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. सुरवातीला शिवरायांच्या पुतळ्यास वंदन करून प्रचार फेरी सुरू करण्यात आली. या वेळी गावातील सर्व रस्त्यांवर घरांपुढे रांगोळ्या काढण्यात आल्या. 

देहूरोडमध्ये बांधण्यात आलेल्या पुलामुळे शहरात होणारी बाहेरील वाहनांची गर्दी कमी झाल्याने गावातील नागरिकांचे गावातील प्रवास आणि रस्त्यावरील व्यवसायांना जागा मोकळी झाल्याने त्यांनी राज्यमंत्र्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com