Vidhan Sabha 2019 : पुण्यातही प्रचाराची रणधुमाळी

Yuti-Aghadi
Yuti-Aghadi

विधानसभा 2019 : पुणे - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधींना ‘कलम ३७०’बाबत बोलण्याचे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांचे आव्हान, पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी गुंडाळण्याची राज्याच्या मंत्री पंकजा मुंडेंची हाक, युती- आघाडीच्या नेत्यांना लोकांचे सोयरसुतक नसल्याचा ‘आप’च्या राघव चड्डा यांचा घणाघणात... अशा भाषणांनी, तसेच शिरूरमधील भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड-शोने पुण्यातील प्रचाराची रणधुमाळी रविवारी (ता. १३) गाजली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या आगामी सभांमधून कोणावर शब्दांचे अस्त्र उपसणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.  

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतील ‘वीक एन्ड’चे निमित्त साधून राजकीय पक्षांनी आपल्या दिग्गज नेत्यांना रविवारी प्रचाराच्या मैदानात उतरविले. भाजपचे रविशंकर प्रसाद आणि मुंडे यांनी आपल्या उमेदवारांसाठी मते मागताना विरोधकांवर जोरदार हल्ला केला. निवडणुकीत काँग्रेस ‘सायलेंट मोड’वर असल्याचे म्हणत प्रसाद यांनी काँग्रेस नेत्यांना डिवचले, तर मुडेंनी पारंपरिक विरोधक पवारांवर टीकास्त्र सोडत, त्यांच्या बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादीला हद्दपार करण्याची घोषणा केली. त्याचवेळी दिल्लीतील विकासाचा पॅटर्न उलगडून सांगताना पुणेकरांनी ‘आप’चा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन करताना चड्डा यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांवर टीकेची झोड उठविली.

दुसरीकडे, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी घरोघर फिरून पुणेकरांकडे मते मागितली. शहरभर राजकीय माहोल तयार झाल्याचे चित्र आज सर्वत्र दिसत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com