Vidhan Sabha 2019 : पर्वती : पवार यांच्या हस्ते ‘शपथनामा’चे प्रकाशन

मुकुंदनगर - व्यापारी मेळाव्यात उमेदवार व नेत्यांनी विजयाची खूण केली. या वेळी (उजवीकडून) खासदार वंदना चव्हाण, अश्विनी कदम, अरविंद शिंदे, रमेश बागवे, शरद पवार, रजनी पाटील, चेतन तुपे.
मुकुंदनगर - व्यापारी मेळाव्यात उमेदवार व नेत्यांनी विजयाची खूण केली. या वेळी (उजवीकडून) खासदार वंदना चव्हाण, अश्विनी कदम, अरविंद शिंदे, रमेश बागवे, शरद पवार, रजनी पाटील, चेतन तुपे.

विधानसभा 2019 : सहकारनगर - पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या शपथनामाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुकुंदनगर येथे व्यापारी मेळाव्यात हे प्रकाशन झाले. याप्रसंगी दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, उद्योगपती विठ्ठल मणियार, पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, फामचे उपाध्यक्ष राजेश शहा, राजेश फुलपगार, खासदार वंदना चव्हाण, माजी खासदार रजनी पाटील, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार यांच्यासह उमेदवार कदम, रमेश बागवे, दत्ता बहिरट, चेतन तुपे, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

या वेळी पवार म्हणाले, ‘‘दिवसेंदिवस प्रश्न वाढतच असून, आर्थिक मंदीचे परिणाम संपूर्ण देशात दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांत राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशातील आर्थिक मंदी घालविण्यासाठी आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी शासनाने पावले उचलणे आणि गुंतवणुकीसाठी विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, आज या विश्वासाला तडा गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशातील अनेक लहान मोठ्या कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत.’’

आपल्या भागातील विकास करण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांमागे व्यापारी वर्गाने पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com