Vidhan Sabha 2019 : शहर, जिल्ह्यातील मतदान केंद्रांत बदल

Naval-Kishor-Ram
Naval-Kishor-Ram

एकवीस मतदारसंघांतील एक हजार १८७ केंद्रांचा समावेश 
पुणे - पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील १ हजार १८७ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये नव्याने बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये शहरातील ७२८ मतदार केंद्रांचा समावेश असून, सर्वाधिक मतदान केंद्र बदलण्यात आलेल्यांची संख्या ही वडगावशेरी मतदारसंघातील आहे. सर्वांत कमी मतदान केंद्र बदलण्यात आलेला मतदारसंघ जिल्ह्यातील आंबेगाव हा आहे.

जिल्ह्यात एकूण ७ हजार ९१५ मतदान केंद्र आहेत. यामध्ये मूळ मतदान केंद्रांची संख्या ७ हजार ६६६ इतकी आहे, तर साहाय्यक मतदान केंद्रांची संख्या २४९ आहे. यातील १ हजार १८७ मतदान केंद्रांमध्ये बदल केला आहे. काही मतदान केंद्रांसाठी तात्पुरते शेड उभारण्यात आले आहेत. तात्पुरत्या मतदान केंद्रांची संख्या २८३ इतकी आहे. मतदान केंद्र स्थलांतर आणि तात्पुरत्या शेडची उभारणी ही सर्व कामे मंगळवारपर्यंत (ता. १५) पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले. 

पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शहरातील ७२८ मतदान केंद्रांमध्ये बदल केला असून, यामध्ये कसबा पेठ मतदारसंघात २७ मतदान केंद्र, हडपसरमध्ये १३६, पर्वतीमध्ये ९१, खडकवासला १४०, कोथरूडमध्ये १४१, शिवाजीनगरमध्ये ९८ आणि वडगावशेरीमध्ये १७५ मतदान केंद्रांचा समावेश आहे; तर ग्रामीण भागातील आंबेगावमध्ये २, खेडमध्ये १०, दौंडमध्ये २, इंदापूरमध्ये ३, पुरंदरमध्ये ३३, भोरमध्ये २७, मावळमध्ये ३, चिंचवड १७५, पिंपरीमध्ये १४५, भोसरीमध्ये ४५ मतदान केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com