Vidhan Sabha 2019 : सोयी नाहीत तर मतदानही नाही

पाषाण -सूस रस्ता - रहिवाशांनी सुविधांपासून परिसर दुर्लक्षित ठेवला जात असल्याने राज्यकर्ते व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मूक मोर्चा काढला.
पाषाण -सूस रस्ता - रहिवाशांनी सुविधांपासून परिसर दुर्लक्षित ठेवला जात असल्याने राज्यकर्ते व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मूक मोर्चा काढला.

विधानसभा 2019 : औंध - मागील काही वर्षांपासून सुविधांपासून दुर्लक्षित होत असलेल्या पाषाण सूस रस्ता परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून ‘सोयी सुविधा नाही तर मतदान नाही’ अशा प्रकारचे फलक हातात घेऊन राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महामार्गाच्या पश्‍चिमेला असलेल्या सोसायट्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असतानाही या भागाकडे दुर्लक्ष होत असल्यानेच हा मूक मोर्चा काढण्यात आल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

विशेषत: गेल्या कित्येक वर्षांपासून महामार्गावर सूस पाषाणला जोडणारा उड्डाण पूल रखडलेला आहे. यामुळे या भागात होणारी वाहतुकीची कोंडी व त्यातून उद्भवणारी परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यावर दुभाजक नसल्याने अपघाताची शक्‍यता असून वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. त्याचबरोबर विजेचा रोजचाच लपंडाव, मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव यासारख्या समस्या नेहमीच भेडसावत आहेत. ॲमेनिटी स्पेसचा प्रश्न तर अधिकच गंभीर आहे. त्याचबरोबर येथे जवळच कचरा प्रकल्पातून येणारी दुर्गंधी व वातावरण प्रदूषित होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. या सर्व अडचणींचा सामना करताना पुरेशा सुविधा दिल्या जाव्यात हीच आमची अपेक्षा आहे, मात्र आम्ही नेहमीच दुर्लक्षित आहोत.

प्रशासन व राज्यकर्त्यांना जाग यावी यासाठी हे आंदोलन असून स्थानिक पातळीवरील विषय सोडवले जावेत ही आमची मागणी आहे असे विनय देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. या वेळी सर्वांनी तोंडाला रुमाल बांधून ‘स्वच्छ हवा हा आमचा अधिकार आहे’ सूस रस्त्याचे प्रदूषण हटवा अशा घोषणांचे फलक दर्शवत आपला निषेध नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com