Maratha Kranti Morcha पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. आजच्या या बंदचा परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यावर जाणवत आहे. यातील बहुतांश कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यांनी 'वर्क फॉर होम'चा पर्याय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचे अतिशय महत्वाचे काम आहे, असे कर्मचारी सकाळी नऊच्या पूर्वीच कंपनीत पोहचत आहेत. तसेच सायंकाळी सहानंतर कंपनीतून बाहेर पडणार आहेत. हिंजवडीत एकूण 120 छोट्या-मोठ्या कंपन्या असून, इथे साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. या सर्वांवर आजच्या बंदचा परिणाम जाणवत आहे. परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यावर जाणवतोय. बहुतांश कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यांनी 'वर्क फॉर होम'चा पर्याय अवलंबला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील महापालिकेच्या 131 शाळा बंद करण्यात आले असून, 13 खासगी महाविद्यालय बंद नेहमीच ट्रॅफिक जाम असलेला पुणे-मुंबई जुना महामार्गावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

- परिस्थिती पिंपरी परिसरातील - 

-  चिंचवडमध्ये म्हशीचे दूध 60 रुपये प्रतिलिटर

-  दैनंदिन दूध विक्रेत्यांची दुकाने बंद 

- रावेत, वाल्हेकरवाडीतील दुकाने बंद  

-  नवी सांगवीत मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी चहा व नाष्ट्याचे छोटे छोटे केंद्र बंद करण्यास भाग पाडले.

- पिंपरीगावात बंदला पूर्ण पाठिंबा. वाहतूक पूर्णपणे ठप्प.

Web Title: #MaharashtraBandh IT Employees Option for Work for home