सदनिकेत इटालियन मार्बल बसवा; महारेराचा गोदरेजला आदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

खरेदीवेळी ठरल्याप्रमाणे ग्राहकाच्या सदनिकेतील लिव्हिंग रूम, किचन आणि दोन बेडरूममध्ये अतिरिक्त पैसे न घेता इटालियन मार्बल बसवून द्यावे, असे आदेश गोदरेज प्रॉपर्टीजला महारेराने दिले आहे. महारेराचे न्यायिक अधिकारी बी. डी. कापडणीस यांनी हा निकाल दिला. 

पुणे : खरेदीवेळी ठरल्याप्रमाणे ग्राहकाच्या सदनिकेतील लिव्हिंग रूम, किचन आणि दोन बेडरूममध्ये अतिरिक्त पैसे न घेता इटालियन मार्बल बसवून द्यावे, असे आदेश गोदरेज प्रॉपर्टीजला महारेराने दिले आहे. महारेराचे न्यायिक अधिकारी बी. डी. कापडणीस यांनी हा निकाल दिला. 

सदनिकेच्या खरेदीवेळी बिल्डरने ग्राहकांना दिलेले वचन पुणे करणे व माहिती पत्रकात दिलेल्या सुविधा पुरविणे बंधनकारक आहे, असेही आदेशात नमूद आहे. तक्रारदार सौरभ पोरेदी व सायली कडके यांनी गोदरेज प्रॉपर्टीजच्या ऑक्‍सफर्ड रियालिटी एलएलपी या केशवनगरमधील प्रकल्पात नोव्हेंबर 2016 मध्ये सुमारे 73 लाख किमतीची सदनिका खरेदी केली होती.

बुकींगवेळी तक्रारदारांना एक पत्रक दिले होते. त्यानुसार संबंधित सदनिकेत सर्व आधुनिक सुविधा देण्यात येतील. तसेच फ्लॅटमधील लिव्हिंग रूम, किचन आणि दोन बेडरूममध्ये इटालियन मार्बलच्या फ्लोअरिंग पुरविल्या जातील, असा उल्लेख होता. मात्र तक्रारदार यांनी नोंदणीकृत करार पाहिला असता त्यात एच इटालियन मार्बलऐवजी नॉर्मल- बिट्रिफाईड टाइल्स असा उल्लेख होता.

तक्रारदारांनी याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावर त्यांना 'प्रकल्पात सामान्य व प्रीमियम असे दोन प्रकारचे फ्लॅट असून इटालियन मार्बलची सुविधा केवळ प्रीमियम सदनिकांत पुरवली जाते व त्यांची किंमत जास्त आहे. तुम्ही सामान्य सुविधा असलेली सदनिका बुक केली आहे. त्यामुळे इटालियन मार्बल फ्लोरिंग पुरविता येणार नाही.' असे उत्तर बिल्डरकडून देण्यात आले.

याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून दिलासा न मिळाल्याने महारेरात तक्रार केल्याचे तक्रारदार यांच्या अर्जात नमूद आहे. त्यांच्यावतीने ऍड. वीरेंद्र महाडीक व ऍड. सुरभी मेहता यांनी काम पाहिले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर रेरा अधिकाऱ्यांनी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे न घेता त्यांच्या सदनिकेत इटालियन मार्बल पुरवावे. तसेच तक्रार र्खच म्हणून तक्रारदारांना 20 हजार रुपये द्यावे, असे आदेश महारेराने दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharera order Godrej about Italian marble in house