एक हजार किलो खिचडी, ५५ हजार केळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

वाघोली - महाशिवरात्रीनिमित्त वाघोली येथील वाघेश्वर मंदिरात हजारो भाविकांनी शुक्रवारी दर्शनासाठी गर्दी केली. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सुमारे ५० हजार ग्लास लस्सी, ५५ हजार केळी, एक हजार किलो खिचडी आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. यासाठी सार्वजनिक मंडळे आणि उद्योजकांनी सहकार्य केले होते.  

मंदिरात गुरुवारी रात्री १२ नंतरच दर्शन व अभिषेकासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पहाटेनंतर गर्दीत भर पडून सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. तसेच मुख्य मंदिरासमोरील छोट्या मंदिरात दिवसभर अभिषेकासाठी रांग होती. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांना बंदी घालण्यात आली होती,

त्यामुळे भाविकांचे दर्शन सुलभ झाले. पुणे- नगर महामार्गालगतच भाविकांनी पोलिसांच्या आवाहनाला झुगारून वाहनांचे पार्किंग केले होते, त्यामुळे वाहतुकीसाठी अधूनमधून अडथळा येत होता. मात्र लोणीकंद पोलिसांनी त्यावर नियंत्रण ठेवून वाहतूक सुरळीत ठेवली. वाघेश्वर विकास ट्रस्ट, ग्रामपंचायत वाघोली आणि ग्रामस्थांच्या वतीने मंदिरात नियोजन करण्यात आले होते.

Web Title: mahashivratri in wagholi