चोरांच्या उलट्या बोंबा; महाविकास आघाडीचा भाजपला टोला

उमेश शेळके
Sunday, 29 November 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपने बोगस मतदारांची नोंदणी केली असल्याचा आरोप केला होता.

पुणे : " मतदार यादीत अनेक मतदारांचे पत्ते नाहीत. तर काही मतदारांच्या नावापुढील फोन नंबर हे भाजपचे आमदार आणि संपर्कप्रमुखांचे आहेत. हे कसे होऊ शकते. भाजपने एक नोव्हेंबर रोजी जे महानोंदणी अभियान राबविले, त्यातून हे प्रकार घडले आहेत,' अशा शब्दात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी "चोराच्या उलट्या बोंबा' असे म्हणत भाजपवर टिका केली. 

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपने बोगस मतदारांची नोंदणी केली असल्याचा आरोप केला होता. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी " महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वीच पराभव मान्य केला,' असल्याचे प्रतिउत्तर दिले होते. 

दरम्यान आज पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज झाली. त्यानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप केला. यावेळी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, खासदार वंदना चव्हाण, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, अभय छाजेड, आबा बागूल, संजय बालगुडे, अजित दरेकर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मतदार यादीतील घोळाची यादीच सादर केली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्यांची दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री कदम म्हणाले,"" राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. आर्थिक चणचण असतानाही कोरोना आणि अतिवृष्टीच्या काळात जनतेच्या मदतीला धावून आले. यांची जाणीव मतदारांना आहे. त्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्‍चित आहे.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर वंदना चव्हाण म्हणाल्या, "महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी चॅलेंज आहे. तिन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणुक हातात घेतली आहे.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi criticizes BJP