esakal | CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

Tips given by Sanika Gumaste ranked first in CET state

सानिकाला पीसीएम ग्रुपमध्ये १०० पर्सेंटाइल मिळवून राज्यात प्रथम आली आहे. सानिकाची आई शिक्षिका आहे, तर वडील इंजिनिअर आहेत. तिला इयत्ता १२वीमध्ये ९६ टक्के गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाचे कुटूंबीयांना आणि  महाविद्यालय, क्लासच्या शिक्षकांना देते. सानिकाचा जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये २ हजार ५१ वा रँक आलेला आहे. त्या जोरावर  तिला इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूर येथे इलेक्ट्रीक ब्रांचला प्रवेश मिळाला आहे.

CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : इयत्ता ११ वी, १२ वीत केलेला अभ्यास आणि जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी केलेले प्रीपरेशनमुळे मला 'एमएचटी-सीईटी'मध्ये हे यश मिळाले. या परीक्षेचा अभ्यास करताना फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ या विषयांच्या पुस्तकांचे बारकाईने वाचन करून त्या समजून घ्यावे, तसेच प्रश्न सोडविण्याच्या सरावात सातत्य ठेवल्यास यश मिळण्याची खात्री वाढते, अशी टिप्स सीईटीत राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सानिकाला पीसीएम ग्रुपमध्ये १०० पर्सेंटाइल मिळवून राज्यात प्रथम आली आहे. सानिकाची आई शिक्षिका आहे, तर वडील इंजिनिअर आहेत. तिला इयत्ता १२वीमध्ये ९६ टक्के गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाचे कुटूंबीयांना आणि  महाविद्यालय, क्लासच्या शिक्षकांना देते. सानिकाचा जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये २ हजार ५१ वा रँक आलेला आहे. त्या जोरावर  तिला इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूर येथे इलेक्ट्रीक ब्रांचला प्रवेश मिळाला आहे.

'सकाळ'शी बोलताना सानिका म्हणाली, ''गेले दोन वर्ष मी जेईई आणि सीईटीचा अभ्यास करत होते. यामध्ये अकरावी-बारावीचे माझे पीसीएमचे पुस्तके बारकाईने वाचून काढली, ते समजून घेऊन अभ्यास सुरू केला. याचा मला फायदा झाला. या परीक्षांसाठी कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवायचा असल्याने ती अवघड असते. यासाठी प्रॉब्लेम सोडवण्याचा खूप सराव करणे आवश्यक आहे. लॉकडाउनच्या काळात चांगला अभ्यास झाला होता. रोज तिनेही विषयांचे प्रॉब्लम सोडवून रिव्हिजन केले. दिवसभरात सरासरी दहा तास अभ्यास केल्याने चांगले गुण मिळतील अशी अशा होतीच, पण सीईटीत राज्यात प्रथम येईल असा विचार केला नव्हता, त्यामुळे खुप आनंद झाला आहे.''
फडणवीसांनी कष्टाने मिळवून दिलेले आरक्षण, या सरकारने टिकवलं नाही : चंद्रकांत पाटील

पुढील करिअर बद्दल ती म्हणाली, "जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये २ हजार ५१ वा रँक मिळाल्याने मी आयआयटी कानपूर येथे प्रवेश घेतला. खरे तर मला पुण्यातल्या 'सीओईपी'मधून इंजिनिअरिंग करण्याची खूप इच्छा होती. पण आता 'आयटीआय'त नंबर लागल्यामुळे तेथे प्रवेश घेतला. माझे ऑनलाईन क्लासेस देखील सुरू झाले आहेत. इलेक्ट्रिकल ब्रांच मधून प्रवेश घेतला असता तरी मला कोणत्याही शाखेतून इंजीनियरिंग करणे आवडले असते. पदवी प्राप्त केल्यानंतर कशात करियर करायचे हे अजून ठरवले नाही. पण संधी मिळाल्यास नोकरीसह, संशोधनात देखील काम करेन.

सीईटी, जेईईची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी टिप्स
- शिकवून झालेला भागाचा विसर पडू देऊ नका.
- त्यासाठी रिव्हीजन महत्त्वाचे आहे.
-आपल्या क्षमतेनुसार रोज तिन्ही विषयांचा किंवा एका विषयाचा अभ्यास करा.
- एसएससी बोर्डाच्या पुस्तकांचे बारकाईने वाचन करा
-  अभ्यासासाठी मोठ्याप्रमाणात साहित्य उपलब्ध आहे, त्याचा वापर करा
- प्रश्न सोडविण्याचा भरपूर सराव करा, तर परीक्षेत चांगले गुण मिळतील
.

पुण्यात आजपासून 4 दिवस 'ड्राय डे'; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

loading image
go to top