पुणे - दापोडीत महावीर जयंती उत्साहात

रमेश मोरे
गुरुवार, 29 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथे भगवान महावीर जयंती जन्मसोहळा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभावक वाणी भूषण प.पू. प्रशांत ऋषीजी यांच्या सानिध्यात संपन्न करण्यात आला. त्यांनी प्रभू महावीरांच्या जीवनाचा संदेश वचनातुन उपस्थितांना सांगितला.

यावेळी आनंद जैन पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी  कव्वाली, समूहगाण सादर करून प्रभू महावीरांची जीवनगाथेचे सादरीकरण केले.'जिओ और जिनो दो, अहिंसा परमो धर्म 'हा संदेश गाण्यांच्या कलाकृतीतुन देण्यात आला. याप्रसंगी देहूरोड येथील 'मायबाप अंधशाळेस' समाज बांधवांकडुन देणगी देऊन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास नगरसेविका आशाताई शेडगे, अभिजीत काटे, निर्मला ताई छाजेड, डॉ. पवन लोढा डॉ. वैशाली लोढा, कन्हैयालालजी कर्नावट, सतीश लुंकड, ललिता लुंकड, मीराबाई लुनावत, पुष्पाताई कर्णावट आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती लुंकड यांनी केले.

Web Title: Mahavir jayanti celebrated in dapodi pune