Mahavitaran : महावितरणच्या योजनेत पुणे आघाडीवर; 'गो-ग्रीन' योजनेत पर्यावरणाला प्राधान्य

महावितरणच्या वीजबिलासाठी ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
Mahavitaran
Mahavitaransakal

पुणे - महावितरणच्या वीजबिलासाठी ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. छापील कागदावरील देयकाऐवजी ‘इ-मेल’, ‘एसएमएस’चा पर्याय एक लाख २३ हजार ३९६ ग्राहकांनी निवडला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ग्राहकांची संख्या एक लाख ७२ हजार ४५० आहे. त्यामुळे त्यांची तब्बल दोन कोटी सहा लाख ९४ हजार रुपयांची वार्षिक बचत होत आहे. राज्यात आतापर्यंत ४ लाख ३५ हजार ९०२ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यात सर्वाधिक ३९.६ टक्के ग्राहक पश्चिम महाराष्ट्रात आहेत. पुणे परिमंडळात सर्वाधिक १ लाख १५ हजार ४३५ ग्राहकांचा सहभाग आहे.

ही योजना निवडल्यास देयकामागे १० रुपये सवलत दिली जाते. त्यामुळे वार्षिक १२० रुपयांची बचत होते. देयक तयार झाल्यानंतर ते संगणकीय प्रणालीद्वारे या योजनेच्या ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविले जाते. याशिवाय ‘एसएमएस’ द्वारेही माहिती दिली जाते. त्यामुळे ‘प्रॉम्ट पेमेंट’सह देयक ऑनलाइन बिल भरणे आणखी सोपे झाले आहे.

ही योजना पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वाची आहे. कागदी वीजबिलांचा वापर बंद केला तरी महावितरण मोबाईल ॲप व वेबसाइटवर ग्राहकांसाठी चालू व मागील देयके तसेच ते भरल्याच्या पावत्या आदींची माहिती मिळते. त्यामुळे या योजनेत सर्व लघुदाब ग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले.

योजनेची माहिती

‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांना महावितरणचे मोबाईल अ‍ॅप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर माहिती मिळेल. सहभागी झालेल्या ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ‘ईमेल’द्वारे दरमहा मिळालेले देयक संगणकात ‘सॉफ्ट कॉपी’मध्ये जतन करून ठेवता येते. संकेतस्थळावर चालू देयकासह गेल्या ११ महिन्यांची देयके मूळ स्वरूपात उपलब्ध असतात. ग्राहक आवश्यकतेप्रमाणे ते कधीही ‘डाऊनलोड’ करू शकतात. मूळ स्वरूपात देयकाची रंगीत छापील प्रत काढण्याचीही सोय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com