Ambadas Danve : महायुती लोकसभेत राज्यात ५० ते ५५ जागा मिळवतील; अंबादास दानवे यांची मिश्किल टिपण्णी

लोकसभा निवडणुकीत महायुती राज्यात ४८ कसल्या ५० ते ५५ जागा मिळवतील. अशी मिश्किल टिपण्णी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
Ambadas Danve
Ambadas Danvesakal

वाघोली - लोकसभा निवडणुकीत महायुती राज्यात ४८ कसल्या ५० ते ५५ जागा मिळवतील. अशी मिश्किल टिपण्णी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

हडपसर येथे एका विवाह सोहळ्याला जाण्यापूर्वी वाघोलीत त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दानवे म्हणाले, सध्या स्थानिक स्वराज संस्थेत अधिकाऱ्यांचे राज आहे. नागरिकांचे प्रश्न सुटत नाही. महायुती सरकारला निवडणुका जिंकण्याची खात्री नसल्याने त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होवू दिल्या नाही.

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना अनेक मतदार संघात उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. निवृत्त अधिकाऱ्यांना ते निवडणूक रिंगणात उतरविण्याचा तयारीत आहेत. ते ४८ पैकी ४५ जागेवर आपला दावा करतात ही हास्यास्पद बाब आहे. ४८ कसले ५० ते ५५ जागा ते जिंकतील असा खोचक टोला त्यांनी मारला.

जरांगे यांची शिंदे सरकारने फसवणूक केली आहे. त्याचा फटका त्यांना निश्चित बसेल. मोदी सरकार आता पुन्हा देशात सत्तेवर येणार नाही. असेही ते म्हणाले. यावेळी काही वाघोलीतील सोसायटी धारकांनी वाघोलीतील प्रश्नाबाबत त्यांना निवेदन दिले. मूलभूत प्रश्न सुटत नसल्याचे त्यांनी दानवे यांना सांगितले.

यावेळी विधानसभा समन्वयक व पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके, मच्छिंद्र सातव, राहुल सातव, शिरूर तालुका प्रमुख पोपटराव शेलार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सारिका हरगुडे, रवी कुटे, वसंत जाधवराव, संग्राम जाधवराव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com