महेश काळे, मुक्ता बर्वे यांना पुलोत्सव सन्मान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित यंदाच्या "पुलोत्सवा'मध्ये शास्त्रीय गायक महेश काळे, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्यासह नाम फाउंडेशनला "पुलोत्सव सन्माना'ने गौरविण्यात येणार आहे, तर दिवंगत अभिनेत्री अश्‍विनी एकबोटे यांना मरणोत्तर "विशेष सन्मान' दिला जाणार आहे.

पुलोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. 10 ते 13 नोव्हेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंच, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासह औंध येथील पं. भीमसेन जोशी नाट्यगृहात "पुलोत्सव' होत आहे.

गायनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी काळे यांना तर कला क्षेत्रासाठी बर्वे यांना "पुलोत्सव तरुणाई सन्मान' देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह आणि 21 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनला "पु.ल.कृतज्ञता सन्मान' मिळणार आहे. स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर नाट्य, चित्रपट आणि नृत्य क्षेत्रात छाप उमटविणाऱ्या एकबोटे यांना मरणोत्तर "पुलोत्सव विशेष सन्मान' देण्यात येणार आहे. त्यांचे कुटुंबीय हा पुरस्कार स्वीकारणार आहेत, असेही चित्राव यांनी सांगितले.

Web Title: Mahesh Kale, Mukta Barve pulotsava award