कॉसमॉस बँक प्रकरणी महेश राठोड आणि जब्बार शेखला18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

1cosmosbank_4.jpg
1cosmosbank_4.jpg

पुणे -  पुणे : कॉसमॉस बँक सायबर दरोड्याप्रकरणी महेश राठोड आणि जब्बार शेख यांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कॉसमॉस बॅंकप्रकरणी तपासात अनेक महत्त्वाचे पैलू हाती आले असून, दोन संशयित आरोपींना अटक झाली होती. या प्रकरणात सुमारे १८ आरोपी निष्पन्न झाले आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोपींचा त्यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बॅंकेच्या सायबर सुरक्षिततेची माहिती घेऊन, नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून पैसे लुटण्यात आले आहेत, या निष्कर्षाप्रत पोलिस पोचले आहेत. आज दोन संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीचा निर्णय न्यायालयाने सुनावला.
   
कॉसमॉस बॅंकेचे २८ देशांतून सुमारे ९४ कोटी रुपये सायबर दरोड्यात लुटले गेले आहेत. ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी फहीम मेहफुज शेख (वय २७, रा. भिवंडी) आणि फहीम अझीम खान (वय २७, रा. औरंगाबाद) यांना मंगळवारी अटक झाली आहे. या प्रकरणात अन्य आरोपी निष्पन्न झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. मात्र या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे, हे आणखी काही आरोपींना अटक झाल्यावर लक्षात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. अनेक शहरांतून एटीएममधून पैसे काढले आहेत. तेथील फुटेजच्या आधारे काहीजण निष्पन्न झाले आहेत. परंतु त्यांना एटीएमची क्‍लोन केलेली कार्डस कोणी पुरविली, ही बाब महत्त्वाची आहे. त्या बाबतही काही धागेदोरे हाती लागले आहेत, असे संबंधित पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com