महामार्गांलगतची मद्यबंदी कायम ठेवा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पुणे - महापालिका हद्दीतून जाणारे राष्ट्रीय व राज्य मार्गांभोवतालच्या 500 मीटर परिसरातील मद्यबंदी उठवू नये, अशा आशयाचे पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी पाठविले. 

पुणे - महापालिका हद्दीतून जाणारे राष्ट्रीय व राज्य मार्गांभोवतालच्या 500 मीटर परिसरातील मद्यबंदी उठवू नये, अशा आशयाचे पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी पाठविले. 

महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मार्गांभोवतालची मद्यविक्रीची बंदी उठविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे विचारणा केली आहे. मात्र राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग हस्तांतरित करण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. त्यामुळे या बाबतचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानेच राज्य सरकारमार्फत घ्यावा, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. या पार्श्‍वभूमीवर महामार्गांच्या परिसरात 500 मीटर अंतरावर मद्यविक्री बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने प्राधान्य द्यावे, अशी मागणी महापौर टिळक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

Web Title: Maintain highways alcoholic beverages