मांजरीत भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू

कृष्णकांत कोबल
रविवार, 8 जुलै 2018

ट्रकचालक ट्रक रस्त्यावर सोडून फरार झाला आहे. हडपसर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मांजरी - वाळूच्या ट्रकने बुलेट दुचाकीस्वाराला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मुत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर रोड शेवाळवाडी येथील पेट्रोल पंपासमोर झाला. ट्रकचालक ट्रक रस्त्यावर सोडून फरार झाला आहे. हडपसर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

शंतनू शरद केकाण (वय १९ रा. एमआयटी कॉलेज हॉस्टेल लोणी, मूळचा रा. संगमनेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

शंतनुने लोणी येथील एमआयटी कॉलेजमध्ये बी टेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. रविवारी (ता. ८) सकाळी तो मित्राला भेटून कॉलजेच्या दिशेने जात होता. तो शेवाळवाडी येथील रुकारी पेट्रोलपंपासमोरून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक (एमएच १२ एफडी ९२७६) ने शंतनू च्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ट्रकने दुचाकीसह त्याला ट्रकच्या खाली फरपटत नेले. यामध्ये पोटाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू झाल्याचे पाहताच ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला.

नागरिकांनी पोलिसांना कळविले तेव्हा पोलिस व रुग्णवाहिकाचालक भारत घुगे यांनी मृतास गोळा करून रूग्णालयात नेले. हडपसर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Major accident at manjari one young boy died