

Satavahana Era Relics Found in Junnar Shed Light on Ancient Trade and Culture
sakal
पिंपळवंडी: जुन्नर शहराच्या पूर्वेकडील सुसरबाग परिसरात शेतीच्या मशागतीदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांना सुमारे २२०० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन अवशेष आढळून आले आहेत. यामध्ये भाजलेल्या मातीचे विविधरंगी मणी, घराची कौले आणि समुद्र शंखाच्या बांगड्यांचे तुकडे सापडले असल्याची माहिती जुन्नरच्या प्राचीन इतिहासाचे अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी दिली.