आगीमुळे पुणे-सोलापूर महामार्गलगतच्या जंगलाचे मोठे नुकसान

सावता नवले
Monday, 8 March 2021

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गलगतच्या गुणवरेवस्तीजवळील दहापंधरा एकर डोंगराला लागलेल्या आगीत गवत, लिंब, बाभुळ जुनी झाडे, काटेरी झुडपे इत्यादी जळून खाक झाला.

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गलगतच्या गुणवरेवस्तीजवळील दहापंधरा एकर डोंगराला लागलेल्या आगीत गवत, लिंब, बाभुळ जुनी झाडे, काटेरी झुडपे इत्यादी जळून खाक झाला. त्यामुळे जनावरे, शेळयामेढयांचा चारा प्रश्न निर्माण झाला असून लहान जीवजंतूच्या मृत्यू झाल्याची शक्यता आहे. ही आग रविवारी (ता. 7) दुपारी चारच्यानंतर लागली. मात्र दिवसा आग लक्षात न येता रात्री रौद्ररूप दिसून आले. ही आग ओढून टाकलेल्या बिडी, सिगारेटमुळे लागल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Breaking : पुण्यात आगीच्या दोन घटना; पुणे-सोलापूर हायवेवर ट्रॅफिक जाम​ 

रविवारी रात्री रात्री साडेदहानंतर ग्रामसुरक्षणा यंत्रणेने फोनद्वारे स्वामी चिंचोली गुणवरेवस्तीजवळील डोंगराला आग लागल्याचा संदेश आला. त्यानंतर ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी जाऊन उपलब्ध तरवडाच्या पाल्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्याची कोणतीही साधने नसताना केवळ तरवडाच्या पाल्याने सव्वा ते दीड तासात ग्रामस्थांनी जीवधोक्यात घालून आग विझविल्याची माहिती माजी सरपंच गजानन गुणवरे दिली. त्यामुळे आगीमुळे होणारे आणखी नुकसान व जीवजंतूचे जीव वाचल्याने अनर्थ टळला.

Breaking : पुण्यात आगीच्या दोन घटना; पुणे-सोलापूर हायवेवर ट्रॅफिक जाम​ 

रस्त्यांलगतच्या  वनविभाग व खासगी डोंगरांना उन्हाळ्याच्या  दिवसांमध्ये अनेक ठिकाणी बिडी, सिगारेटमुळे आगी लागण्याच्या किंवा जाणिवपूर्वक लावण्याच्या घटना घडतात. आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी आवश्यक साधने नसल्याने जीवधोक्यात घालून प्रयत्न करावे लागतात. मात्र या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. अशा आगीमध्ये मोठयाप्रमाणात निसर्ग संपत्तीचे नुकसान होते. तरीही ठोस कारवाई व उपाययोजना होत नसल्याने दरवर्षी न भरून येणाऱ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. यासंदर्भात शासनस्तरावर ठोस उपाययोजना व आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major damage to forest near pune-solapur highway due to fire